Saturday, 11 November 2017

अवैध उत्खनन व वाहतूक दारांकडून 41 प्रकरणात 5 लाख 20 हजार रुपये दंड वसूल



        नागपूर, दि. 11 : अवैधपणे रेती तसेच गौण खनीजाचे उत्खनन तसेच वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध जिल्ह्यात 41 प्रकरणात 5 लाख 20 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.
            ॲन्टी मायनिंग दिवस अभियानांतर्गत तालुका व उप विभागीय स्तरावर विशेष मोहीम राबविण्यात आली असून अवैध वाहतूक करणाऱ्या तसेच रेतीचे उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 499 प्रकरणात 98 लाख 30 हजार 541 रुपये शासन जमा करण्यात आले आहे. तसेच 28 प्रकरणात 4 लाख 91 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. अवैध उत्खनन व वाहतूक  नागपूर तालुक्यात(शहरी व ग्रामीण)  19 हजार चारशे, हिंगणा 97 हजार 200, भिवापूर 30 हजार 500, कामठी 10 हजार 400, पारशिवनी 42 हजार 800, रामटेक 7 हजार 900, उमरेड 34 हजार 500, काटोल 77 हजार 700, नरखेड 18 हजार 700, कुही 22 हजार 800, कळमेश्वर 67 हजार रुपये शासन जमा करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.

*****

No comments:

Post a Comment