मुंबई, दि. 6 : दक्षिण
ऑस्ट्रोलियाचे गव्हर्नर हायू वॅन ली एसी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांची आज मंत्रालयात भेट घेतली. यावेळी स्मार्ट सिटी, पायाभूत
सुविधा, ऊर्जा, कृषी आदी विविध विषयांवर चर्चा झाली.
गव्हर्नर
श्री. ली यांच्यासोबत दक्षिण ऑस्ट्रेलियाचे सांस्कृतिक व युवा व्यवहार मंत्री झोय
बेटिसन, गव्हर्नरांचे सचिव हुज बॉरोमन, आंतरराष्ट्रीय
स्ट्रॅटेजिक व व्यापार विभागाचे संचालक नॅरली सिल्व्हॅक, ऑस्ट्रेलियाचे
महावाणिज्यदूत टोनी हुबर आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. यावेळी राजशिष्टाचार मंत्री
प्रा. राम शिंदे, राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, अपर मुख्य
सचिव सुनील पोरवाल, प्रधान सचिव राजगोपाल देवरा आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री
श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात सर्वाधिक नागरिकरण आहे. त्यासाठी नागरी सुविधा
पुरविण्यासाठी राज्य शासनाने 10 स्मार्ट सिटी उभारणार आहे.
त्याचबरोबर पायाभूत सुविधांच्या विकासाठी मेट्रोचे जाळे, शेती
क्षेत्रातील सुधारणा यावर राज्य शासन भर देत आहे. यासाठी ज्ञानाची व तंत्रज्ञानाची
देवाणघेवाण दोन्ही राज्यांमध्ये व्हावी.
गव्हर्नर
श्री. ली यांनी भारत व ऑस्ट्रेलियाच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व
औद्योगिक संबंध दृढ असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, स्मार्ट
सिटी,
आर्टिफिशियल
इंटिजिजन्स, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी महाराष्ट्रास सर्वतोपरी सहाय्य करण्यास
ऑस्ट्रेलिया तयार आहे. माहितीच्या देवाणघेवाणीतून दोन्ही राज्यामधील संबंध अधिकदृढ
होतील.
००००


No comments:
Post a Comment