मुंबई, दि.२: माहिती व जनसंपर्क
महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात 'राज्याच्या उद्योग
वाढीस चालना'
या
विषयावर उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री
वाहिनीवरून शुक्रवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी प्रसारित होणार आहे. ही मुलाखत
संजय जोग यांनी घेतली आहे.
राज्यातील उद्योग क्षेत्राच्या वाढीला
चालना देण्यासाठी 'मेक इन इंडिया ही संकल्पना काय आहे. तसेच परवानामुक्त धोरण, विशाल
प्रकल्प धोरण, महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स धोरण- २०१६, सुक्ष्म, लघु, मध्यम
उद्योगांना चालना देण्यासाठी शासनाचे धोरण, खनिज
विकासाला चालना देण्यासाठी शासन स्तरावर ठरविण्यात आलेले धोरण, राज्याचे
किरकोळ व्यापार धोरण आणि उद्योग वाढीसाठी लागणा-या पायाभूत सुविधांसाठी शासनाने
कोणते निर्णय घेतले आहे. याची सविस्तर माहिती “जय महाराष्ट्र”कार्यक्रमातून
श्री. देसाई यांनी दिली आहे.
००००

No comments:
Post a Comment