मुंबई, दि. 6 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात 'ग्रामविकासातून महिला सबलीकरणाकडे ' या विषयावर ग्रामविकास,महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार, ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदिका उत्तरा मोने यांनी घेतली आहे.
गेल्या तीन वर्षात ग्रामीण विकास विभाग आणि महिला व बालविकास विभागाअंतर्गत मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, झिरो पेडन्सी अभियान, माझी कन्या भाग्यश्री योजना, उमेद अभियान, बचत गटांचे सक्षमीकरण, कौशल्य विकास, स्मार्ट ग्राम योजना, आपले सरकार सेवा केंद्र, सर्वांसाठी घर, स्वच्छता अभियान, कुपोषणमुक्त गावं या योजना प्रभावीपणे राबविण्यात आलेल्या आहेत.या सर्व योजनांची सविस्तर माहिती “जय महाराष्ट्र” कार्यक्रमातून पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
००००

No comments:
Post a Comment