मुंबई, दि. 8 : आजच्या पिढीपर्यंत पु.ल. देशपांडे यांचा समृद्ध साहित्यिक वारसा पोहचविण्यासाठी पुलंच्या जन्मशताब्दी वर्षात सांस्कृतिक कार्य विभागामार्फत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तयार करण्यात येत आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे दिली.
पु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने आयोजित 'पु.ल. कला महोत्सव २०१७' चे उदघाटन तावडे यांच्या हस्ते रवींद्र नाट्यमंदिरात झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रख्यात अभिनेते मनोज जोशी यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव नितीन गद्रे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment