Tuesday, 7 November 2017

उपसा सिंचन योजनेची कामे डिसेंबर अखेर पर्यंत पूर्ण करणार - गिरीष महाजन

शेळगाव बॅरेजवरखेड लोंढेनिम्न तापी व कुऱ्हा वढोदा इस्लामपूर
         
मुंबईदि. 7 : शेळगाव बॅरेजवरखेड लोंढेनिम्न तापी व कुऱ्हा वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेची कामे डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आज येथे दिली.
मंत्रालयात श्री. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत विविध प्रकल्पांच्या कामाच्या प्रगतीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. महाजन म्हणालेशेळगाव बॅरेज प्रकल्पातील प्रस्तंभाच्या संधानकाची (काँक्रीट) कामे आवश्यक तांत्रिक बाबी पूर्ण करुन २२ नोव्हेंबर2017 रोजी सुरु करण्यात यावेत. या प्रकल्पातील अंजाळे पूल व जोगलखेड या पुलांची निविदा प्रक्रिया 15 नोव्हेंबर2017 पर्यंत पूर्ण करावी. तसेच या प्रकल्पातील समाविष्ट उर्वरित  पुलांची निविदा प्रक्रिया ३० नोव्हेंबर२०१७ पर्यंत पूर्ण करावी. वरखेड-लोंढे व निम्न तापी या प्रकल्पांच्या पिलर्स (प्रस्तंभ) ची काँक्रीट कामे 01 डिसेंबर2017 रोजी सुरु करावेत. कुऱ्हा वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेस आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनानाशिक यांच्याकडून मंजूर करुन योजनेची चाचणी डिसेंबर 2018 पर्यंत घेण्यात यावी. २२ सहकारी उपसा सिंचन योजनांची देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे नोव्हेंबर-2017 अखेर सुरु करावीतअसे निर्देश श्री. महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच हतनूर प्रकल्पाच्या सांडव्यामधील अतिरिक्त ८ दरवाजेची कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव त्वरित सादर करावाअसेही श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.
तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत प्रलंबित सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या विविध प्रस्तावाचा यावेळी आढावा घेण्यात आला.
या बैठकीस आमदार हरीभाऊ जावळेस्मिता वाघउन्मेश पाटीलचंदूभाई पटेल उपस्थित होते. तसेच जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहललाभ क्षेत्र विकास सचिव श्री. बिराजदारप्रकल्प समन्वय सचिव श्री. पानसेतापी महामंडळाचे कार्यकारी संचालक संजय कुलकर्णीमेरी संचालक श्री. खापरे तसेच नाशिक मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेचे मुख्य अभियंता श्री. उपासनी व महामंडळातील सर्व अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंते उपस्थित होते.
००००

No comments:

Post a Comment