Friday, 10 November 2017

पद्मश्री स्व. कमलाताई होस्पेट यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण


नागपूरदि. 10 : महाल येथील मातृसेवासंघ, सुतिकागृहाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन स्व. कमलाताई होस्पेट यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री       देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी केंद्रीय परिवहन महामार्ग, जहाज बांधणी, जलस्त्रोत व गंगा शुद्धीकरण विभाग मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मातृसेवासंघ, महाल शाखेच्या अध्यक्षा श्रीमती कांचन गडकरी, सचिव श्रीमती वैदेही भाटे, कोषाध्यक्ष     श्रीमती इरावती दाणी उपस्थित होत्या.
मातृसेवासंघ सुतिका गृहाची स्थापना  1 ऑगस्ट 1927 रोजी झाली. गेल्या 90 वर्षांच्या कालावधीत येथे दोन लाखांवर प्रसुती करण्यात आल्या आहेत. हे सुतिकागृह 80 खाटांचे असून येथे बालरोग विभाग आहे. मातृसेवा संघाच्या वतीने मल्टिपर्पज हेल्थ वर्कर ट्रेनिंग सेंटर नावाने नर्सिंग प्रशिक्षण केंद्र चालविल्या जाते.
*****

No comments:

Post a Comment