नागपूर, दि. 20 : सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यात मौखिक आरोग्य तपासणी राबविण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून उद्या दि. 21 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळातील सदस्य विधानपरिषद व विधानसभेचे सदस्य तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मौखिक तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज येथे दिली. विधानभवनाच्या प्रांगणातील शासकीय दवाखान्यासमोर हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
000
No comments:
Post a Comment