मुंबई, दि. 2 : कला संचालनालयामार्फत
58 व्या महाराष्ट्र राजय कला प्रदर्शनाचे आयोजन पुण्यात करण्यात आले असून या
प्रदर्शनाचे उदघाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार
आहे.
कला प्रदर्शनाच्या उदघाटनाला माजी उपमुख्यमंत्री
आमदार अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर, खासदार
सुप्रिया सुळे, चित्रकार प्रा. सुधाकरराव चव्हाण, अपर मुख्य
सचिव सीताराम कुंटे आदी उपस्थित राहणार आहेत.
पुणे जिल्हयातील बारामती येथील
अप्पासाहेब पवार सभागृह, शारदा नगर, माळेगाव
कॉलनी येथे राज्य कला प्रदर्शन 4 जानेवारी ते 10 जानेवारीपर्यंत असणार आहे. या
प्रदर्शनादरम्यान 58 व्या राज्यकला प्रदर्शनातील पारितोषिक प्राप्त कलाकारांचा
सत्कार करण्यात येणार आहे.
००००
No comments:
Post a Comment