मुंबई, दि.2:मराठी
भाषेचे वैभव जपण्यासाठी व संवर्धनासाठी 1 ते 15 जानेवारी
या कालावधीत `मराठी भाषा संवर्धन पंधरवडा` मराठी भाषा
विभागामार्फत साजरा करण्यात येणार आहे. यां पधरवडयानिमित्त विविध कार्यक्रमांचे
आयोजन राज्यभरात करण्यात आले आहे.
मराठी भाषा विभागामार्फत मंत्रालयातील
त्रिमूर्ती प्रांगणात 10 जानेवारी ते 12 जानेवारी
दरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन
करण्यात आले आहे. ग्रंथप्रदर्शनाबरोबरच मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात विविध
कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. 10 जानेवारी
रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मराठी भाषेसंदर्भात चालता
बोलता प्रश्नमंजुषा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.11 जानेवारी 2018 रोजी
संकल्प कलामंच शब्दांचे धन हा कार्यक्रम दुपारी 4 ते
संध्याकाळी 5.30 पर्यंत सादर करणार आहेत. यामध्ये अभिवाचन, नाटयछटा, काव्यवाचन, संगीत आणि
नृत्य असे असेल. 12 जानेवारी रोजी नवीन
प्रशासन भवन, 8 वा मजला येथे मराठी विकीपिडीया प्रशिक्षण कार्यक्रम आहे.
याशिवाय महाराष्ट्र राज्य साहित्य
संस्कृती मंडळामार्फत 4 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता
पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे देणाऱ्याने देत जावे हा विंदांच्या
कवितांचे गायन, अभिवाचन, विंदांच्या साहित्यकृतीवर आधारीत
लघुपटाचे सादरीकरण असा आगळावेगळा कार्यक्रम सादर होणार आहे.
भाषा संचालनालयामार्फत मराठी भाषा
गौरव दिंडी 4 जानेवारी रोजी सकाळी 9 ते सकाळी 10 या काळात
वांद्रे येथील शासकीय वसाहत येथे निघणार आहे. याबरोबरच वांद्रे येथील प्रशासकीय
इमारत परिसरात 4 आणि 5 जानेवारी रोजी
ग्रंथप्रदर्शन आणि विक्री याचे आयोजन सकाळी 10.30 ते
संध्याकाळी 5.30 या वेळेत करण्यात आले आहे. तसेच महात्मा गांधी विदयामंदिर येथे 4 जानेवारी
रोजी सकाळी 11 वाजता मराठी भाषेचा उगम आणि विकास यामध्ये संतांची भूमिका व कार्य
यावर व्याख्यान ठेवण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश
निर्मिती मंडळामार्फतही ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन 11 जानेवारी
ते 13 जानेवारी
दरम्यान करण्यात आले आहे. सातारा येथे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती
मंडळ आणि वाचन जागर अभियान यांच्या संयुक्त विदयमाने हे ग्रंथप्रदर्शन आयोजित
करण्यात आले आहे.तर मराठी विश्वकोश याबाबत 10 जानेवारी
रोजी मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
राज्य मराठी विकास संस्थेमार्फत मराठी
विकीपिडीयाविषयक जागृती कार्यशाळेचे आयोजन पूर्ण पंधरवडा करण्यात आले आहे. सदर
कार्यशाळा सांगली, सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूर, बीड,उदगीर, उमरगाव, रत्नागिरी
येथील महाविदयालये आणि विदयापीठात होणार आहे.याबरोबरच ग्रंथप्रदर्शन 4 जानेवारी
ते 6 जानेवारी 2018 दरम्यान
प्रशासकीय इमारत, शासकीय वसाहत, वांद्रे येथे आयोजित करण्यात आले आहे.
वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली
यांच्यामार्फत ठाणे आणि नाशिक येथे स्वच्छंद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
आहे. तसेच या पंधरवडयानिमित्त मिती क्रिएशन यांच्यामार्फत अभिवाचन कार्यक्रमाचेही
आयोजन करण्यात आले आहे.
००००
No comments:
Post a Comment