· 20 हजार 800 डोजेस उपलब्ध
नागपूर,दि.09 : शहर तसेच जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा प्रकोप पाहता आरोग्य सेवा परिमंडळाच्या वतीने स्वाईन फ्लू प्रतिबंधक अतिरिक्त लसीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आरोग्य सेवामंडळास 20 हजार 800 डोजेस उपलब्ध करण्यात आले आहेत, अशी माहिती उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी दिली.
सप्टेंबर 2017 नंतर जिल्हा शल्य चिकित्सक स्तरावर 500 डोजेसचा साठा उपलब्ध करून देण्यात आला. सद्यस्थितीत जिला शल्य चिकिस्तक स्तरावर 100 डोजेस उपलब्ध आहेत. डोजेसच्या कमतरतेमुळेस्वाईन फ्लू बाधितांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची काळजी घेत आरोग्य सेवा परिमंडळने मुंबईतील हाफकिन यांच्याकडे डोजेसची मागणी केली होती. मागणीनुसार संबंधित पुरवठाधारकांने परिमंडळास 20 हजार 800 डोजेसचा पुरवठा केला आहे.
आरोग्य सेवा परिमंडळ, नागपूर यांच्या अधिनस्थ संस्थांना उपलब्ध स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस साठ्याचे मागणीनुसार वाटप करण्यात येणार असल्याचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी कळविलेआहे.
****
No comments:
Post a Comment