मुंबई, दि. 4 : जिल्हा कौशल्य विभाग, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने 5 जानेवारी 2018 रोजी रेल निकुंज हॉल, रेल्वे कंपाऊंड, मुंबई सेंट्रल, मुंबई-8,येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या रोजगार मेळाव्यात खाजगी क्षेत्रातील किमान 40 उद्योजक प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहणार आहेत. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उद्योजकांना रिक्त पदभरतीसाठी उमेदवाराची थेट मुलाखत घेण्याची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे. या मेळाव्यात 300 हुन अधिक रिक्त पदांची भरती होणार आहे. हा मेळावा दहावी पास नापास/12 वी पास/पदवीधर/ पदव्युत्तर पदविका/डिप्लोमा/इंजिनिअर/एम.बी .ए./मॅनेजमेंट/आय.टी.आय./एन.सी. टी.व्हि.टी. धारकांसाठी आयोजित करण्यात आला आहे.
इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रे
नोंदणी कार्ड/फोटो व चार बायोडाटासह शुक्रवार दि. 05 जानेवारी रोजी रेल निकुंज हॉल, रेल्वे कंपाऊंड, मुंबई सेंट्रल, मुंबई-8 येथे उपस्थित राहावे. तत्पूर्वी उमेदवारांनीhttps://rojgar.mahaswayam.in या वेबपोर्टलवर job fair या Tab वर जावून apply बटनला क्लिक करुन मेळाव्यासाठी सहभाग नोंदवावा. या संधीचा जास्तीत जास्त फायदा उमेदवारांना घ्यावा,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शक केंद्र, मुंबई शहर यांनी केले आहे.
००००
No comments:
Post a Comment