Wednesday, 3 January 2018

छायाचित्रकार सुनील धारगावे यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप

            नागपूर, दि. 3 :- संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय कार्यालयात छायाचित्रकार म्हणून कार्यरत असलेले सुनील धारगावे नियत वयोमानानूसार सेवानिवृत्त झाले. त्यांना आज संचालक माहिती कार्यालयात  निरोप देण्यात  आला.
            अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर उपस्थित होते. सुनिल धारगावे यांना सेवानिवृत्ती निमित्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला.    
            यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सहाय्यक संचालक जगन्नाथ पाटील यांची उपस्थिती होती. त्यांनी छायाचित्रकार धारगावे यांच्या कार्यशैली व स्वभावाचे वर्णन करीत भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
            सहकारी छायाचित्रकार राकेश वाटेकर यांनी धारगावे यांच्या समवेत घालवलेल्या 18 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव व्यक्त करीत काही आठवणींना उजाळा दिला.  
            जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी अध्यक्षीय भाषणातून धारगावे यांनी त्यांचा शांत आणि संयमी स्वभाव हा नेहमी सहकार्यांसाठी प्रेरणादायी ठरला. नवीन वर्षात संकल्प करुन चांगल्या प्रकृतीची सिद्धी मिळवा, अशा शुभेच्छा देत भविष्यात ही फोटोग्राफीचा छंद कायम ठेवावा अशी आशा व्यक्त केली. 
            कार्यक्रमाचे संचालन माहिती सहाय्यक प्रभाकर बारहाते व आभार लेखापाल गजानन जाधव यांनी मानले. कार्यक्रमास अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

                                                                    

                            ****

No comments:

Post a Comment