·
हैद्राबाद हाऊस मुख्यमंत्री कार्यालय शिबिर
·
3 हजार 700 चालक वाहकांची तपासणी
नागपूर, दि. 6 : शहरातील
स्कूल बस तसेच वाहनांच्या चालक व
वाहकांकरिता हैद्राबाद हाऊस येथील मुख्यमंत्री
कार्यालयात नि:शुल्क नेत्र तपासणी
शिबिर आयोजित करण्यात आले आहे. नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन रविवार, दिनांक 7
जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या हस्ते होणार आहे.
शहरातील स्कूल बस
तसेच वाहनांच्या चालक व वाहकांकरिता नि:शुल्क नेत्र शिबिरामध्ये 1
हजार 844 स्कूल बसेस व वाहनांची नोंदणी झालेली असून सुमारे 3 हजार 700 वाहक- चालकांना या नेत्र तपासणी
शिबिराचा लाभ मिळणार आहे. नेत्र तपासणी शिबिर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील अनुभवी नेत्र शल्य चिकित्सा
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित
करण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. के. आर. सोनपुरे यांनी दिली.
नेत्र तपासणी शिबिर 22
फेब्रुवारीपर्यंत रविवारी तसेच दुसऱ्या
शनिवारी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले असून प्रत्येक रविवारी 450 ते 500 वाहक-चालकांची मोफत नेत्र तपासणी
करण्यात येणार आहे. नेत्र तपासणी शिबिर 13
जानेवारी दुसरा शनिवार, 14 जानेवारी , 21
व 28 जानेवारी रोजी
सकाळी 10 वाजता तसेच 10 व 11
फेब्रुवारी सकाळी 10 वाजेपासून शिबिरात
वाहनचालक व वाहकांची नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. या नेत्र तपासणीचा लाभ स्कूल
बस चालक व वाहकांनी घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्यकारी
अधिकारी डॉ. के. आर. सोनपुरे यांनी केले
आहे.
***
No comments:
Post a Comment