Saturday, 3 March 2018

राज्यसभा निवडणूक वृत्तांकनासाठी प्राधिकार पत्रासाठी प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी दि. 6 पूर्वी अर्ज करण्याचे आवाहन


            मुंबईदि. 3: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून निवडूण देण्यासाठीच्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषीत केला आहे. या निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीचे वृत्तसंकलन व छायाचित्रण करण्यासाठी मतदान केंद्र तसेच मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना भारत निवडणूक आयोगातर्फे प्राधिकारपत्रे देण्यात येणार आहेत.
            त्यासाठी इच्छुक वृत्तपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधिंनी दिनांक 6 मार्च  2018 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे तपशील व संपादकांच्या शिफारशीसह अर्ज पाठवावा. अर्जासोबत 1. पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्रे जोडावीत. एकाच व्यक्तीला मतदान तसेच मतमोजणी अशा दोन्ही केंद्रामध्ये प्रवेश हवा असल्यासअशा व्यक्तींची तीन छायाचित्रे देणे आवश्यक राहील.  छायाचित्रांच्या छायांकित (झेरॉक्स) प्रती स्वीकारल्या जाणार नाहीत. प्राधिकारपत्रे द्यावयाच्या व्यक्तींची संख्या मर्यादित असावी. विहित दिनांक व वेळेपूर्वीच आपले अर्ज द्यावेत. दिनांक 6 मार्चनंतर नंतर आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. संबधित इच्छुकांनी आपले अर्ज श्री. युवराज ठाकूरवरिष्ठ सहायक संचालक (प्रशासन)माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्याकडे द्यावेत.
0000
सचिन गाढवे/वि.सं.अ./दि. 3.3.2018

No comments:

Post a Comment