Wednesday, 28 March 2018

टेंभुर्णी-लातूर रस्त्याच्यादुरुस्तीसाठी कार्यारंभ आदेश देऊन कामाला सुरूवात करणार - चंद्रकांत पाटील


मुंबई, दि.28: टेंभुर्णी-कुर्डूवाडी-बार्शी-लातूर हा रस्ता राज्यमार्ग क्र.145 मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने रस्त्याची दूरवस्था झालेली आहे. याबाबत लवकरच कार्यारंभ आदेश देऊन कामाला सुरूवात केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सांगितले.
यासंदर्भात सदस्य त्र्यंबकराव भिसे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर उत्तर देताना श्री. पाटील म्हणाले, याबाबत राज्यमध्ये 6 कोटींची कामे मंजूर केली आहेत. यासाठी निविदा काढण्यात आल्या असून राज्यात 29 कोटी 47 लाखाचा निधी यासाठी देण्यात आला आहे.
केंद्रसरकारकडून 30 कोटी 59 लाख देण्यात आले आहेत. रूंदीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सोपविण्यात आले असून रुंदीकरणासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल.
याचर्चेत सदस्य सर्वश्री दिलीप सोपल, सुभाष साबणे यांनी सहभाग घेतला.
००००

No comments:

Post a Comment