मुंबई, दि.28: मिरा-भाईंदर शहराच्या विकास योजनांमध्ये
करण्यात आलेल्या अतिक्रमणांबाबतअधिकारी नेमून त्यामार्फत चौकशी करून पंधरा दिवसात
अतिक्रमणे काढणार, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत सांगितले.
याबाबत सदस्य प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत लक्षवेधी
सूचना मांडली होती.
त्यास उत्तर देताना श्री. पाटील म्हणाले, मनपा आयुक्त व अतिरिक्त पोलीस अधिक्षक
यांना याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. मिरा-भाईंदर महानगरपालिकेतील क्षेत्रात
काजुपाडा, चेणा, वर्सोवा, माशाचा पाडा, डाचकुलपाड, मांडवी
पाडा, राईपाडा इत्यादी क्षेत्रात स्थानिक आदिवाशी बांधवांची
घरे असून त्याठिकाणी ते गेल्या पन्नास वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून वास्तव्यास
आहेत. यापरिसरामध्ये अन्य देशातील नागरिकांनी येऊन अतिक्रमण केले असून या
प्रकरणातील दोषी अधिकारी असतील याचीही चौकशी केली जाईल, असेही डॉ. पाटील यांनी
सांगितले.
००००
No comments:
Post a Comment