Tuesday, 27 March 2018

गर्भजल परीक्षा होऊ नये यासाठी सातत्याने कारवाई - सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत

मुंबई, दि. 27; राज्यात गर्भजल चाचणी करणाऱ्यांवर कठोर कारवाई होत असते, सिमेलगतच्या भागात परराज्यात जाऊन असे परिक्षण करून घेण्याचे निदर्शनास आले आहे, 20 जिल्ह्यात 538 तक्रारी आल्या आहेत. राज्यातील सर्व सोनोग्राफी केंद्रांवर सातत्याने तपासणी करण्यात येते व दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येते असे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य डॉ.नीलम गोऱ्हे, हेमंत टकले आदिंनी प्रश्न उपस्थित केला होता.
००००

No comments:

Post a Comment