Tuesday, 27 March 2018

चिखलदरा पर्यटन विकास करणार - पर्यटन मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. 27:चिखलदरा हे राज्यातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ असून त्याचा विकास करण्यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला असल्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.
श्री. रावल पुढे म्हणाले, पर्यटन विकासासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सिडकोला नेमण्यात आले असून संत गाडगे बाबा समाधीस्थळासाठी 37 कोटी तर एकूण विकासासाठी सुमारे 115 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य सर्वश्री प्रा.अनिल सोले, जोगेंद्र कवाडे, जयंत पाटील आदिंनी प्रश्न उपस्थित केला होता.
००००

No comments:

Post a Comment