Tuesday, 27 March 2018

ग्रामीण भागातील डिजीटायझेशन खासगी संस्थांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतुन करावे - सभापती रामराजे नाईक निंबाळकर


मुंबई, दि. 27 :राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये त्यांच्या स्वउत्पन्नातून आपले सेवा केंद्रसुरु करण्यात येत आहेत ही बाब स्त्युत्य आहे, या निमीत्ताने  ग्रामीण भागातील डिजीटलायजेशन होत आहे. मात्र ज्या ग्रामपंचायतींकडे निधी नाही अशा ठिकाणी ग्रामीण भागातील डिजीटायझेशन खासगी संस्थांच्या सामाजिक उत्तरदायित्व (सी. एस. आर) निधीतून करावे अशी सूचना सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज विधान परिषदेत केली.
 ‘आपले सरकार सेवा केंद्रप्रत्येक ग्रामपंचायतीत सुरु करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला गेला होता. या प्रश्नाला ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी उत्तर दिले. यावेळी उपस्थित झालेल्या एका उपप्रश्नाच्या संदर्भाने सभापतींनी वरील सूचना केली.
यावेळी श्री. भुसे यांनी सांगितले, ग्रामविकासात पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने आणि ऑनलाईन कामकाज होण्यासाठी ज्या ग्रामपंचायतींनी ठराव संमत केला असेल अशा ग्रामपंचायतींना स्वउत्पन्नातून , 14 व्या वित्त आयोगातून, आदिवासी विकास विभागाकडून प्राप्त निधीतून किंवा इतर कोणताही मुक्त निधी ज्याचा खर्च करण्याचा अधिकार ग्रामपंचायतींना आहे  आपले सेवा केंद्रस्थापन करता येते. राज्यात आतापर्यंत सुमारे 20 हजार ग्रामपंचायती डिजीटल झाल्या असल्याची त्यांनी यावेळी माहिती दिली.
वरिल विषयाच्या अनुषंगाने सदस्य सर्वश्री सतेज पाटील, जयंत पाटील आदिंनी प्रश्न उपस्थित केला होता.
००००

No comments:

Post a Comment