Thursday, 26 April 2018

पंचवीस लाख क्विंटलहून अधिक तूर खरेदी - सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख


मुंबई, दि.26 : राज्यात आजपर्यंत १९२ तूर खरेदी केंद्रांवर २५ लाख ४७ हजार ८१७ क्विंटल तूर खरेदी  करण्यात आली असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली.
तूर खरेदीला नुकतीच केंद्रशासनाने मुदतवाढ दिली असुन आता १५ मे पर्यंत तूर खरेदी करण्यात येईल. 2 लाख 4 हजार 483 इतक्या शेतकऱ्यांकडून ही तूर खरेदी करण्यात आली आहे.
            राज्यात  हमीभावाने हरभरा खरेदीला 1 मार्चपासून सुरुवात झाली असुन काल (24)  एप्रिल पर्यत 194 केंद्रांवर 22 हजार 656 शेतकऱ्यांकडून ३ लाख दहा हजार 244क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करून तूर व हरभरा खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकार वपणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.
००००
शैलजा वाघ दांदळे/विसंअ

No comments:

Post a Comment