Tuesday, 29 May 2018

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज

 नागपूर दि.29 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी/मार्च2018चा निकाल बुधवारदिनांक 30 मे रोजी दुपारी वाजता मंडळाच्या संकेत स्थळावरून ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.
मंडळाचे संकेत स्थळ  www.mahresult.nic.in, www.result.mkcl.org www.maharashtraeducation.com, http://www.knowyourresult.com,hscresult.mkcl.org, http://jagranjosh.com, www.bhaskar.com तसेच कार्यालय दूरध्वनी क्रमांक 0712-2565403, 2553401 यावर संपर्क साधू शकतील. याशिवाय बीएसएनएल ग्राहक 57766 या क्रमांकावर MHHSC<space><seat no> टाकून एसएमएसद्वारे देखील परीक्षेचा निकाल प्राप्त करू शकतात.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूरच्या वतीने विद्यार्थी व पालकांसाठी हेल्पलाईन सेवा सुरु करण्यात आली आहे. निकाल जाहीर झाल्यापासून गुणपत्रिका वितरणाच्या दिनांकापर्यत मंडळाची हेल्पलाईन सेवा सुरु राहीलअशी माहिती मंडळाचे विभागीय सचिव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


*****

No comments:

Post a Comment