नागपूर, दि. 29 : यावर्षीच्या 13 कोटी वृक्षलागवड करण्याचे नियोजित असून, त्याचाच एक भाग म्हणून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दि. 30 मे रोजी वनामती नवीन सभागृह, नागपूर येथे दुपारी 1.00 वाजता आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला पालकमंत्री चंद्रशेखर बानकुळे, सर्व लोकप्रतिनिधी, वन विभागाचे सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त अनूप कुमार तसेच सर्व जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
यावर्षी संपूर्ण राज्यात 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 13 कोटी वृक्षारोपण करुन भविष्यातील हरित महाराष्ट्र बनविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून पूर्ण होणार आहे. ही बैठकीत वृक्ष लागवडीसंदर्भातील कार्यक्रमाचे नियोजन, वृक्षारोपणाची पूर्वतयारी, त्यासमोरील आव्हाने व उपाययोजना याबाबत या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment