नागपूर दि.04 : सामाजिक न्याय विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड, संत रविदास, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राविण्य पुरस्काराचे वितरण करण्यात येते. सन 2018-19 अंतर्गत पुरस्कारासाठी विभागामार्फत दिनांक 15 जूनपर्यत ईच्छूकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पुरस्कारासाठीचे अर्ज नमुने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व जिल्हा परिषद जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुक स्वयंसेवी संस्था अथवा व्यक्ती कार्यालयातून अर्ज नमुना प्राप्त करुन आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करू शकतात. याशिवाय पुरस्कारासाठीचे निकष व अर्जाचे नमुने http://sjsa.maharashtra. gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहेत.
ईच्छूकांनी अधिक माहितीकरिता जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
*****
No comments:
Post a Comment