नागपूर दि.04 : महानगरपालिका आयुक्त यांच्या दालनात महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाद्वारे बुधवार, दिनांक 6 जून रोजी दुपारी 2.30 वाजता जनसुनावणी घेण्यात येणार आहे.
जनसुनावणी दरम्यान नागरीक भूखंड किंवा सदनिका ताबा मिळण्यास येत असलेल्या अडचणी, विकासक अधिक पैशांची मागणी करीत असेल, अशा प्रकारच्या तक्रारी मांडू शकतील. महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे उप सचिव तथा कार्यालय प्रमुख गिरीश जोशी यांच्या उपस्थित होणाऱ्या जनसुनावणीत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment