Monday, 4 June 2018

संतोष राखडेच्या मृत्यूची होणार चौकशी

                नागपूर दि.04 : नागपूर मध्यवर्ती कारागृह येथील कैदी/मार्गस्त बंदी क्रमांक एम-325 संतोष फत्तुजी राखडे वय (30) यांच्या मृत्यूची उपविभागीय दंडाधिकारी यांच्यामार्फत चौकशी  करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी, नागपूर यांनी दिले आहे. 
संतोष फत्तुजी राखडे  यांचा 20 एप्रिल 2018 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यू होण्याची कारणे व परिस्थिती तसेच त्याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या इतर संयुक्तिक कारणांचा अहवाल सादर करणे आवश्यक आहे.
या घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छुकांनी सर्व माहिती आणि सत्य परिस्थितीबाबत आपले लेखी निवेदन शपथपत्रासह तहसील कार्यालयनागपूर येथील खोली क्र. 1 मधील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयनागपूर शहर येथे 24 जूनपूर्वी सादर करावेअसे उपविभागीय दंडाधिकारी  शिरीष पांडे  यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*****

No comments:

Post a Comment