Wednesday, 6 June 2018

शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह रामटेक येथे प्रवेश प्रक्रिया सुरु


        नागपूर,दि.06 : शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह रामटेक येथे सन 2018-19 करीता विद्यालयीन व महाविद्यालयीन तसेच प्रवर्गनिहाय मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
शासनाच्या वतीने शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह रामटेक येथे प्रवेशित विद्यार्थिनींना निवासदूधनाश्ताजेवनबिछाना साहित्यपुस्तके व स्टेशनरी साहित्यगणवेशदरमहा निर्वाह भत्ता रुपये 500 व स्वच्छता प्रसाधन रुपये 100 व इतर सवलत प्रदान करण्यात येणार आहे.
इच्छूक विद्यार्थिनींनी शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतीगृहटक्कामोरे कॉम्प्लेक्स टिळक वार्डरामटेक येथे प्रत्यक्ष संपर्क साधण्याचे आवाहन वसतीगृहाच्या वतीने करण्यात आले आहे.
*****

No comments:

Post a Comment