Saturday, 2 June 2018

हातमाग विणकरांनी नाव नोंदणी करा



                नागपूर दि.02 : प्रादेशिक उपसंचालक (वस्त्रोद्योग) कार्यालयामार्फत मे. कवी डाटा मॅनेजमेंट सर्व्हीस ली. हैद्राबादच्या वतीने चौथ्या हातमाग विणकरांची गणना करण्यात आली आहे. कंपनीच्या वतीने करण्यात आलेल्या गणनेत हातमाग विणकराचे नाव सुटल्यास त्यांनी नाव नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक उपसंचालक (वस्त्रोद्योग) कार्यालयाद्वारे करण्यात आले आहे.
प्रादेशिक उपसंचालक (वस्त्रोद्योग) कार्यालयात उपलब्ध गणना यादीत त्यांचे नाव घ्यावे तसेच यादीत नाव नसल्यास हातमाग विणकराने नवीन प्रशासकीय इमारत क्र. 2, 8 वा मजला, सिव्हील लाईन्स, नागपूर येथील कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधून आपले नाव समाविष्ट करावे, असे सुचविण्यात आले आहे.  
*****

No comments:

Post a Comment