Monday, 25 June 2018

रास्तभाव दुकानात 35 रुपये किलो दराने तूरडाळ पलब्ध


नागपूरदि.25: जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानामार्फत 35 रुपये किलो दराने तूरडाळ उपलब्ध करुन देण्यात आली असून शिधापत्रिकाधारकांनी तरडाळ खरेदी करावीअसे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.
नागपूर जिल्ह्याकरिता शासनाने हजार क्विंटल तूरडाळ उपलब्ध करून दिली आहे. ही तूरडाळ 35 रुपये प्रति किलो याप्रमाणे विक्रीसाठी जिल्ह्याला उपलब्ध झाली असून रास्तभाव दुकानामार्फत शिधापत्रिकाधारकांना ही डाळ उपलब्ध होणार आहे.
***** 

No comments:

Post a Comment