Monday, 25 June 2018

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन आज


नागपूरदि.25: राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती दिनानिमित्त दिनांक 26 जून रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियमदीक्षाभूमी येथे सामाजिक न्याय दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष उपस्थिती राहतील.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागजिल्हास्तरीय सामाजिक विकास शक्ती पदत्त समिती,  प्रादेशिक उपायुक्ततसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात मागासवर्गीय लाभार्थींना योजनांच लाभ व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर श्रीमती नंदा जिचकारखासदार सर्वश्री डॉ. विकास महात्मेकृपाल तुमानेआमदार सर्वश्री ना. गो. गाणारप्रकाश गजभियेप्रा. जोगेंद्र कवाडेप्रा. अनिल सोलेगिरीश व्याससुनील केदारकृष्णा खोपडेविकास कुंभारेसुधाकर देशमुखसुधीर पारवेडॉ. मिलींद मानेसमीर मेघेसुधाकर कोहळेडॉ. आशिष देशमुखमल्लीकार्जुन रेड्डीजिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निशा सावरकरदिपक गेडामजिल्हाधिकारी अश्विन मुदगलजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव,पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडेसमाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाडउपायुक्त आर. डी. आत्राम आदी प्रमुख अतिथी उपस्थित राहणार आहेत.
जास्तीत-जास्त नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विजय वाकुलकरजिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.
*****

No comments:

Post a Comment