Friday, 1 June 2018

नागरी सेवा (पूर्व) परीक्षा रविवारी 46 उपकेंद्रावर

                      16859 परीक्षार्थींची उपस्थिती राहणार        
नागपूर, दि. 01 : संघ लोकसेवा आयोग, नवी दिल्लीमार्फत रविवार दिनांक 3 जून रोजी नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2018 घेण्यात येणार आहे. या परीक्षेकरिता नागपूर येथील 46 उपकेंद्राची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
            रविवारी होऊ घातलेली नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2018 दोन सत्रात सकाळी 9.30 ते 11.30 व दुपारी 2.30 ते 4.30 वाजेपर्यत घेण्यात येईल. नागपूर येथील 46 उपकेंद्रावर 16 हजार 859 परीक्षार्थी सहभागी होणार आहेत. परीक्षार्थीची कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सर्व केंद्रांवर पर्यवेक्षक, सहाय्यक पर्यवेक्षक, समवेक्षक, लिपीक अशा एकूण 900 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय स्थानिक निरीक्षक अधिकारी देखील नियुक्त करण्यात आला आहे.
            परीक्षार्थींनी प्रथम सत्रात सकाळी 9.20 वाजता तसेच द्वितीय सत्रात दुपारी 2.20 वाजता केंद्रावर उपस्थित राहावे. परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्र, ओळखपत्र, काळा बॉल पॉईन्ट पेन तसेच आयोगाने परवानगी दिलेलेच साहित्य आणावे. कॅल्युलेटर, मोबाईल फोन, आय पॅड इत्यादी इलेक्ट्रॉनिक साधने परीक्षा केंद्रावर आणू  नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
*****

No comments:

Post a Comment