नागपूर दि.02 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर येथे कार्यरत सहायक संचालक जगन्नाथ पाटील यांची जळगाव येथे माहिती अधिकारी पदी बदली झाली आहे. त्यानिमित्त जगन्नाथ पाटील यांना कार्यालयाच्या वतीने आज स्नेहपूर्वक निरोप देण्यात आला.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय कार्यालयात आयोजित कार्यक्रमात माहिती संचालक राधाकृष्ण मुळी यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर, माहिती सहायक प्रभाकर बारहाते, श्रीमती अपर्णा यावलकर व कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
नागपूर येथे साडेतीन वर्षापासून जगन्नाथ पाटील यांनी खेळीमेळीच्या वातावरणात काम करीत पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे सांभाळली. कष्ट करण्याची तयारी आणि कामाची सचोटी यातून त्यांनी माहिती विभागामध्ये आपली चांगली प्रतिमा तयार केली, असे माहिती संचालक राधाकृष्ण मुळी म्हणाले.
नागपूर येथे कामाचे अनुभव विशद करताना जगन्नाथ पाटील म्हणाले की, हे शहर अनोळखी होते. त्यामुळे मनात भिती होती, परंतु कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे येथे काम करताना कुठल्याही प्रकारची अडचण भासली नाही. येथे कार्यरत प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून काहीतरी नवीन शिकायला मिळाले. भविष्यात येथील कामाच्या अनुभवाचा उपयोग होईल, असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर, माहिती सहायक प्रभाकर बारहाते, कोमल बानाईत यांनी समायोचित विचार व्यक्त केले. माहिती सहायक श्रीमती अपर्णा यावलकर यांनी संचालन केले.
*****
No comments:
Post a Comment