नागपूर, दि. 01 : राज्यातील सर्व जिल्हयात खरीप हंगामसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2018 पर्यत तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना 24 जुलै 2018 पर्यंत अर्ज करायचा आहे.ही योजना अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी एच्छिक स्वरुपाची आहे.
शेतकरऱ्यांना भरावा लागणारा विमा हप्ता हा खरीप हंगामातील पिकांसाठी 2 टक्के, व नगदी पिकांसाठी 5 टक्के राहील. तसेच सर्व पिकांसाठी जोखिमस्तर 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. ही योजना वर्धा, भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी विमा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी विमा कंपन्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
या योजनेत सहभागी घेण्यासाठी शेतकऱ्यांना पिक पेरा प्रमाणपत्रासह बँक खातेपुस्तकाची प्रत, आधारकार्ड छायांकित प्रत, सादर करणे आवश्यक आहे. आधारकार्ड उपलब्ध नसल्यास आधारकार्ड नोंदणी पावतीसह मतदान ओळखपत्र, किसान क्रेडिटकार्ड किवा नरेगा जॉबकार्ड तसेच वाहनचाल परवाना सादर करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना अर्ज करताना कुठलीच अडचण येवू नये म्हणून यासाठी कृषी विभागाच्या वतीने लवकरच आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यात येणार आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, किवा बॅकेशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment