नागपूर, दि. 01 : जातीभेद विसरुन सलोखा निर्माण करणाऱ्या जिल्हयातील 843 आंतरजातीय तसेच दिव्यांग-अव्यंग 30 विवाहीताचा गौरव आज जिल्हा समाजकल्याण विभागातर्फे करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात आज जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्या वतीने आंतरजातीय विवाहीत आणि दिव्यांग – अव्यंग विवाहीत जोडप्याचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, कृषी व पशुसंवर्धन समितीच्या आशा गायकवाड, महिला व बालकल्याण सभापती पुष्पाताई वाघाडे, समाजकल्याण सभापती दीपक गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी प्रिया तेलकुंटे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुकेशिनी तेलगोटे, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना घरच्यांकडून तसेच समाजाकडून पांठिबा मिळत नाही अनेकदा आई वडीलांच्या रोषासह त्यांची समाजाकडून अहवेलना होत असते. समाजात खोलवर रुजलेल्या जातीव्यवस्थेमुळे अनेकदा जीवन जगणे कठिण होते समाजातील जातीयता नष्ट करायची असेल तर आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन द्यावे . तसेच आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांनी जातीभेद विसरुन समाजात सलोखा निर्माण करण्याचा आदर्श निर्माण केला आहे. असे मत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शरद डोणेकर यांनी व्यक्त केले.
समाजात परपरांगत रुढी , परपंरा आजही जिवत असल्यामुळे आंतरजातीय विवाह या गोष्टीचा समाजाकडून स्विकार होताना दिसत नाही. परंतु आजची नवीन पिढी नवीन विचारासह नवीन गोष्टींचा स्विकार करत असल्यामुळे आंतरजातीय विवाह करण्यास मागेपुढे पाहत नाही. आंतरजातीय विवाह करुन आजची पिढी नवीन आदर्श निर्माण करीत आहेत. ज्या जोडप्यांनी आंतरजातीय विवाह केलेल्या आहे त्यांनी शेवटपर्यंत नांदा सोख्य भरे या प्रमाणे शेवटपर्यंत एक दुसऱ्यांसाठी जगावे असे मत समाजकल्याण सभापती दीपक गेडाम यांनी व्यक्त केले.
संसाराची दोन्ही चाके सुरळीत असेल तर संसार व्यवस्थीत पार पडतो. परंतु आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना घरच्यांचा पाठिबा नसल्यामुळे अनेकदा संकटांचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेवून महाराष्ट्र शासनाने आंतरजातीय विवाहीत जोडप्यांसाठी आंतरजातीय विवाह योजना सुरु केली. यामध्ये आंतरजातीय विवाहीत जोडप्यांसाठी शासनाने 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. यामुळे विवाह करणाऱ्यांना आर्थिक मदत व्हावी हा यामागच्या उद्देश होता. असे मत महिला व बालकल्याण सभापती पुष्पाताई वाघाडे यांनी वक्त केले.
मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार म्हणाले विवाहीत जोडप्यांनी आपल्या संसार वृक्षाप्रमाणे बहरु द्यावा .कितीही संकटे आली तरी डगमगून जाता खबीरप्रमाणे उभे राहावे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुकेशिनी तेलगोटे आपल्या प्रस्ताविक करताना म्हणाल्या दरवर्र्षी शासनाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यासाठी आपली संपूर्ण टिम सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. आंतरजातीय विवाहीत 843 जोडप्यांचा तसेच दिव्यांग – अव्यंग 30 जोडप्यांना दीपक गेडाम व शरद डोणेकर यांच्याहस्ते पु्ष्पगुच्छ आणि 50 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुकेशिनी तेलगोटे तर संचालन डॉ. मिनल सांगोळे तर आभार प्रवीण बोंडे यांनी मानले. कार्यक्रमाला अधिकारी व कर्मचारी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

No comments:
Post a Comment