Monday, 4 June 2018

पर्यावरण विभागातर्फे बुधवारी जागतिक पर्यावरण दिन

            मुंबईदि. 4 : पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यावतीने दि. 6 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदमपर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
            हा कार्यक्रम सकाळी 10 वाजतायशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाननरिमन पॉईंटमुंबईयेथे होणार आहे. यावेळी वसुंधरा पुरस्कारलघुचित्रपट स्पर्धा पारितोषिक वितरण केले जाणार असून वातावरणीय हवा गुणवत्ता संनियंत्रण योजनेचा शुभारंभजैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन ऑनलाईन प्रणालीचे उद्‌घाटनप्लास्टिक बंदी मोबाईल ॲपचा शुभारंभ तसेच लोकराज्य मासिकाच्या पर्यावरण विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
            या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ.पी.अनबलगन यांनी केले आहे.
००००

No comments:

Post a Comment