Tuesday, 26 June 2018

शहरातील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा - विभागीय आयुक्त अनूप कुमार



नागपूर दि 26 : शहरात 92 खाजगी शिकवणी वर्ग तसेच संस्थाचालकांना पार्कीग समस्येबाबत नोटीस बजाविण्यात आली आहे. मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी 11 मालकांवर कारवाई करण्यात आली असून अशाच प्रकारची कारवाई शहराच्या इतर भागातही करावी. शहरातील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी दिले आहेत.
शहर व सभोवतालच्या परिसरातील वाहतुक व पार्कीगच्या प्रश्नांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविण्याबाबत जनहित याचीकेच्या संदर्भात विभागीय आयुक्तांनी आढावा घेतला. यावेळी   पोलीस उपायुक्त वाहतुक चैतन्य एस., उपायुक्त संजय धिवरे, उपविभागीय अधिकारी शिरीष पांडे, उपायुक्त    महानगरपालीका नितीन कापडणीस, विभागीय वाहतुक अधिकारी अशोक वाडीभस्मे, सहायक व्यवस्थापक संदीप बापट यासह संबंधीत यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शाळा किंवा महाविद्यायालयीन विद्यायार्थ्याकडून वाहतुक नियमांचे पालन व्हावे म्हणून जनजागृती करण्यात आली असून 156 प्राचार्य व मुख्याध्यापकांकरवी विद्यार्थ्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत. जानेवारी महीन्यापासून आतापर्यत एकुण 78 अल्पवयीन वाहन चालकाविरूद्ध विशेष मोहीमेअंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती यावेळी रस्ता सुरक्षा दलाने दिली.
सिताबर्डी येथील वाहतुक कोंडी तथा पार्कींग संबंधाने यापूर्वी प्रायोगीक तत्वावर कार्यवाही करण्यात आलेली होती. त्यावर आता महानगरपालीकेच्या स्तरावरून पार्कीग पॉलीसी निश्चीत झाल्यानंतरच यासंबंधाने कार्यवाही निश्चीत करण्यात यावी असे निर्देश आयुक्तांनी दिले.
महानगरपालीकेकडुन पार्कींग पॉलीसीबाबत विस्तृत प्रकल्प अहवाल प्रकल्पाचे सादरी सल्लागार यु.एम.टी.सी यांनी पार्कीग व्यवस्थापनेबाबत सादरीकरण केले.
महानगरपालीका हद्दीतील बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांच्या परिस्थिती व नविन बांधण्यात येणारे रोड रंम्बलर, स्पिड ब्रेकर याबाबतीतही  सादरीकरण करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले.
वाहतुक व्यवस्था सुरळीत राहण्याच्या दृष्टीने कार्यकारी यंत्रणांनी केलेली कार्यवाही ठळकपणे मा.न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावी अशी सूचनाही  विभागीय आयुक्तांनी केली.
                                                                        ** * * * **

No comments:

Post a Comment