नागपूर दि.26 : सामाजिक क्रांतीचे थोर उद् गाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज मंगळवार, दि. 26 जून रोजी विधान भवन, नागपूर येथे त्यांच्या प्रतिमेस महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव उत्तमसिंग चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उप सचिव विलास आठवले, नागनाथ थिटे, अवर सचिव सुभाष नलावडे, प्रकाशचंद्र खोंदले, उमेश शिंदे, श्रीमती पुनम ढगे, सुनील झोरे, विजय कोमटवार, ग्रंथपाल तथा माहिती व संशोधन अधिकारी बा. बा. वाघमारे यांचेसह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
*****
No comments:
Post a Comment