Monday, 25 June 2018

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ शिष्यवृत्तीकरिता अर्ज आमंत्रित


नागपूर दि.25 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दहावी तसेच बारावीपदवीपदविका परीक्षेमध्ये कमीत कमी 60 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येणार आहे. अनुसूचित जातीतील लाभार्थी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कागदपत्रेशिधा पत्रिकाउत्पन्न दाखलाफोटोसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादितडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनदक्षिण अंबाझरी रोडनागपूर येथे सादर करावे.
                                                           *****

No comments:

Post a Comment