नागपूर दि.06 : पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांचे गुरुवार दिनांक 7 जून रोजी सकाळी 10 वाजता मुंबई येथून नागपूर विमानतळावर आगमन व शासकीय वाहनाने चंद्रपूर जिल्ह्याकडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वाजता रविभवन नागपूर येथे आगमन व राखीव. रात्री 8.30 वाजता नागपूर येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.
*****
सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचा नागपूर दौरा
नागपूर दि.06 : सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांचे गुरुवार, दिनांक 7 जून रोजी सकाळी 8.30 वाजता मुंबई येथून नागपूर विमानतळावर आगमन व रविभवन, नागपूरकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता रविभवन येथे आगमन व राखीव.
*****
केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांचा नागपूर दौरा
नागपूर दि.06 : केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांचे गुरुवार, दिनांक 7 जून रोजी सकाळी 7.30 वाजता दिल्ली येथून नागपूर विमानतळावर आगमन. सकाळी 7.40वाजता नागपूर येथून यवतमाळकडे प्रयाण.
*****
कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा नागपूर दौरा
नागपूर दि.06 : कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे, शुक्रवार, दिनांक 8 जून रोजी सकाळी 8.50 वाजता पुणे येथून नागपूर विमानतळावर आगमन व मोटारीने रविभवनकडे प्रयाण. सकाळी 9.30 शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे नागपूर विभाग जिल्हानिहाय खरीप हंगामाचे नियोजन व कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा व इतर विषयाबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 3.30 वाजता स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5.15 वाजता नागपूर रेल्वे स्थानकावरून अकोल्याकडे प्रयाण.
*****
No comments:
Post a Comment