Wednesday, 6 June 2018

डॉ. अरविंद जामखेडकर यांना जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार प्रदान


नागपूर दि.06 : छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्या वतीने प्राच्यविद्यापंडित डॉ. अरविंद जामखेडकर यांना जिजामाता विद्वत गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदगुरुदास महाराज यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सायंटिफिक सभागृह येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गो. बं. देगलूरकर होते. तर श्रीमती अनुराधा जामखेडकरभालचंद्र देशकर व्यासपिठावर उपस्थित होते.  
सत्कारमूर्ती डॉ. अरविंद जामखेडकर यांनी पुरातत्वविद्इतिहासकारपुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु तसेच पुरातत्व संचालनालयाचे संचालक पदाची धुरा सांभाळली. आपल्या कार्यासंदर्भातील आठवणींना उजाळा देताना डॉ. जामखेडकर म्हणाले कीविदर्भाची भूमी समृद्ध आहे. येथे काम करण्याचा वेगळाच अनुभव मिळाला. या भूमीवर जे काम नोंदले गेलेत्याची येथील लोकांनी दखल घेतली याचा सर्वाधिक आनंद होत आहे. गुरुजनांचे आशिर्वाद आणि सहकाऱ्यांची साथ यामुळेच खऱ्या अर्थाने जीवनात केलेल्या प्रत्येक कामाला यश मिळत गेले. या गौरवाचे गुरुजन आणि सहकाऱ्यांना त्यांनी श्रेय दिले.
डॉ. अरविंद प्र. जामखेडकर यांना जिजामाता विद्वत पुरस्कारात मिळालेली राशी त्यांनी दोन सामाजिक संस्थांच्या कार्यासाठी दान केली. नागपुरातील विदर्भ संशोधन मंडळ आणि धुळ्याचे समर्थ वाघदेवता मंदिर यांचा समावेश असून 51 हजार रुपयांची राशी त्यांनी या संस्थांना विभागून देत असल्याची घोषणा केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय देशकर यांनी केले. मानपत्र वाचन प्रसन्न बारलिंगे यांनी  तर सूत्रसंचालन शुभांगी चिंचाळकर यांनी केले.
*****

No comments:

Post a Comment