Thursday, 7 June 2018

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा आणि प्रधान सचिव मनीषा वर्मा यांची मुलाखत


          मुंबई, दि. 7 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मिशन शौर्य’ अतंर्गत आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील एव्हरेस्ट शिखर सर केलेल्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथेवर आधारित आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा आणि प्रधान सचिव मनीषा वर्मा यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून उद्या शुक्रवार दि.  जून रोजी संध्याकाळी 7.30 ते 8 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.
            चंद्रपूर जिल्ह्यातील कवीदास काठमोडेउमाकांत मडावीपरमेश आडे, मनीषा धुर्वेविकास सोयाम या पाच आदिवासी विद्यार्थ्यांनी मिशन शौर्य अंतर्गत एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. नेमका हा उपक्रम काय आहे, ही संकल्पना राबविण्यामागचा उद्देशएव्हरेस्ट शिखर मोहिमेची तयारी कशा प्रकारे केलीमोहिमेत राज्य शासनाचे व आदिवासी विकास विभागाचे लाभलेले सहकार्यविद्यार्थ्यांना प्रशासनाने प्रशिक्षण कालावधीत केलेले सहाय्यएव्हरेस्ट मोहिमेत सहभागी विद्यार्थ्यांचे प्रशिक्षक अविनाश देऊस्कर, विमला देऊस्करमोहिमेचे प्रमुख शेखर बाबूटीमसाठी नियुक्त डॉक्टर डॉ. रवी वायकर यांची या मोहिमेतील भूमिका याबाबत सविस्तर माहिती आदिवासी विकास मंत्री श्री. सवरा, प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी  जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:

Post a Comment