मुंबई, दि. 7 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित आकाशवाणीच्या दिलखुलास कार्यक्रमात "छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना" या विषयावर सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस. एस. संधू यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून उद्या शुक्रवार दि. 8 आणि शनिवार दि. 9 जून रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक सुरेश ठमके यांनी ही मुलाखत घेतली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेला 15 जून 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. शेतकरी हिताच्या अनुषंगाने या योजनेत करण्यात आलेली दुरुस्ती, शेतकरी कर्जासाठी अर्ज करण्याची पद्धत व अंतिम तारीख, तालुकास्तरीय समिती मार्फत अर्जाची छाननी, शेतकऱ्यांना खरीप 2018मध्ये पीक कर्ज मिळण्याबाबत योजना, लाभार्थ्यांच्या खात्यावर बँकाद्वारे आकारण्यात येणारे व्याज व त्याबाबतचे धोरण आदी विषयांची माहिती श्री. संधू यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:
Post a Comment