नागपूर, दि.25: शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे अंतर्गत 2018-19 करिता 19
वर्षे वयोगटातील मुलींना फुटबॉल खेळाकरिता प्रवेश चाचणी घेण्यात येणार आहे.
चाचणीमध्ये सहभागी होण्यास इच्छूक खेळाडूंनी दिनांक 27 जूनपर्यंत शिवछत्रपती
क्रीडापीठ, म्हाळूंगे-बालेवाडी पुणे येथे कागदपत्र सादर करण्याचे आवाहन जिल्हा
क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.
सन 2018-19 करिता शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे अंतर्गत विविध क्रीडा
प्रबोधिनीमध्ये 19 वर्षे वयोगटातील मुलींना फुटबॉल खेळासाठी प्रवेश देण्यात येणार
आहे. सरळ व खेळनिहाय कौशल्य चाचणी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे
बालेवाडी येथे दिनांक 28 जून रोजी घेण्यात येणार आहे.
सरळ प्रवेशाकरिता राज्यस्तरावर पदक प्राप्त खेळाडू किंवा राष्ट्रीयस्तरावर
सहभागी खेळाडू पात्र मानल्या जाईल तसेच राज्यस्तरावर सहभागी झालेला खेळाडू कौशल्य
चाचणीकरिता पात्र मानण्यात येणार आहे. गुणाच्या आधारे मुलींची फुटबॉल खेळाडू
म्हणून निवड करण्यात येईल.
चाचणी परिक्षेकरीता येणाऱ्या इच्छूक खेळाडूच्या निवास व्यवस्थेसह भोजन तसेच
प्रवासखर्चाची व्यवस्था शासनामार्फत करण्यात येणार असल्याने जास्तीत जास्त
खेळाडूंनी या चाचणीत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड
यांनी केले आहे.
*****
एकविध क्रीडा संघटनेची बैठक 27 जूनला
नागपूर, दि.25: विविध 15 विषयांवर मार्गदर्शन तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंची
माहिती संकलीत करण्यासाठी, 7वी शालेय एशियन बॅडमिंटन स्पर्धेबाबत मार्गदर्शनाकरिता
एकविध क्रीडा संघटनेची दिनांक 27 जून रोजी दुपारी 4.30 वाजता बैठक आयोजित करण्यात
आली आहे. सदर बैठकीत उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड
यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment