Monday, 30 July 2018

दिलखुलास कार्यक्रमात श्राव्य लोकराज्य एकच लक्ष्य 13 कोटी वृक्ष


                मुंबई,दि. 30 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जुलै महिन्यात प्रसिद्ध झालेला “एकच लक्ष्य 13 कोटी वृक्ष”या लोकराज्य अंकातील लेख “श्राव्य लोकराज्य”या स्वरूपात दिलखुलास कार्यक्रमात प्रसारित होणार आहेत. आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून मंगळवार दि. 31 जुलै आणि बुधवार दि.1 ऑगस्ट रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत या श्राव्य स्वरूपातील लेखांचे प्रसारण होणार आहे. निवेदक राजेश राऊत यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले आहे.
           लोकराज्य अंकात रा. चिं. ढेरे यांनी संपादित केलेले ‘रामचंद्र अमात्य प्रणीत स्वराज्य निती-आज्ञापत्र’ या पुस्तकातील ‘शिवरायांचे आज्ञापत्र’ हा लेख तसेच ‘झाडे अशी लावा’, ‘फोन करा, मदत मिळवा’ आणि ‘गाव तिथे वनराई’ या लेखांतून वृक्ष संवर्धनाचे महत्व, वनविभागाची हॅलो फॅारेस्ट 1926 हेल्पलाईन, झाडं लावताना घ्यावयाची काळजी या विषयांची माहिती देण्यात आली आहे.
००००



No comments:

Post a Comment