Monday, 30 July 2018

'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला

मुंबईदि. ३० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रया कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांची मुलाखत घेण्‍यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. ३१ जुलै रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका पल्लवी मुजूमदार यांनी ही मुलाखत  घेतली आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवातत्यामागचा उद्देश व संकल्पना आणि वैशिष्ट्येमहिलांचे सक्षमीकरणमहिला व तरुणांसाठी राबविण्यात येणा-या विविध योजना ,या अभियानाबद्दल करण्यात आलेली जनजागृती तसेच ऑन अ बॅच’ ही संकल्पना या विषयांची माहिती श्रीमती आर. विमला यांनी 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून दिली आहे .
००००

No comments:

Post a Comment