नागपूर, दि.27 : अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळा तसेच प्रशासकीय सुसज्ज अशा इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार दिनांक 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सिव्हील लाईन्स परिसरातील वेस्ट हायकोर्ट रोडवर होणार आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळा व प्रशासन इमारतीच्या भूमिपूजन सोहळयाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच जलस्त्रोत व जहाजबाधणी मंत्री नितीन गडकरी राहणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, अन्न व नागरी पुरवठा व अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामान्य प्रशासन विभागाचे राज्य मंत्री मदन येरावार महापौर नंदाताई जिचकार, वैद्यकीय शिक्षण व औषधी विभागाचे सचिव संजय देशमुख, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त डॉ. पल्लवी दराडे आदी उपस्थित राहणार आहे.
वेस्ट हायकोर्ट रोडवरील नागपूर मेट्रो कार्यालयासमोर अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळा तसेच अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे प्रशासकीय इमारत उभी राहणार असून ही इमारत सुमारे दीड हजार चौरस मीटर परिसरात बांधण्यात येणार आहे. या इमारतीसाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी जमीन उपलब्ध करुन दिली आहे. यावेळी खासदार विकास महात्मे, खासदार कृपाल तुमाने तसेच सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. भूमिपूजन सोहळयास उपस्थित रहावे, असे अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त डॉ. राकेश तिरपुडे व नागपूर विभागाचे सहआयुक्त प्र. ना. शेंडे यांनी केले आहे.
*****

No comments:
Post a Comment