'सोशल मीडियावरील अफवा
: सावधानता आणि सतर्कता'
मुंबई, दि.6 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास
कार्यक्रमात महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक बाळसिंग राजपूत यांची 'सोशल मीडियावरील अफवा
: सावधानता आणि सतर्कता'या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत
उद्या शनिवार दि. 7
जुलै आणि सोमवार दि.9
जुलै रोजी आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.
निवेदिका मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.
सोशल मीडियाद्वारे पसरविण्यात येणाऱ्या अफवांचा अटकाव व
अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर सायबर पोलिसांद्वारे करण्यात येणारी कारवाई तसेच सोशल
मीडिया वापरताना घ्यावयाची खबरदारी याविषयांची माहिती श्री. राजपूत यांनी दिलखुलास
कार्यक्रमातून दिली आहे.
000

No comments:
Post a Comment