नागपूर, दि. 03 : रा स्त धान्य दुकान, शालेय पोषण आहार, महिला व बाल विकास योजनांपासून लाभार्थ्यांना वंचित ठेवण्यात आल्याच्या तक्रारी राज्य अन्न आयोगाच्या जिल्हा तक्रार निवारण कार्यालयास करता येणार आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम,2013 अंतर्गत अतिरिक्त जिल्हाधिकारी जिल्हा तक्रार निवारण अधिकारी म्हणून प्राप्त तक्रारीचे निवारण करणार. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरु करण्यात आलेल्या तक्रार निवारण कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून किंवा राज्य अन्न आयोगrajyaannaayog@gmail.com तसेच जिल्हा तक्रार निवारण अधिकारीaddllcollector.ngp@ gmail.com या संकेतस्थळावर देखील वंचित लाभार्थी अर्ज सादर करु शकतो. याशिवाय कार्यालयाच्या 0712-2565130 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment