नागपूर, दि.3: राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्षलागवड या महत्वाकांक्षी योजनेत सर्वांनी सहभागी होऊन वृक्षलागवड करणे व त्यांचे संवर्धन करणे आवाश्यक आहे. पर्यावरणाच्या संतुलनासाठी प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक असल्याचे ग्रंथालयाच्या सहायक संचालक श्रीमती मीनाक्षी कांबळे यांनी सांगितले.
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक मंडळ मुक्त सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर माजी उपमहापौर सतीश होले तसेच नं. दा. वाहणे उपस्थित होते.
राज्य शासनाच्या ‘ हरित महाराष्ट्र’ या संकल्पनेनुसार राज्यात यंदा 13 कोटी वृक्ष लागवडीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून देताना प्रत्येकाने वृक्षलागवड करुन त्यांचे संगोपन व संवर्धन करणे गरजचे असल्याचे यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन श्रीमती पवित्रा ढवळे यांनी केले तर आभार सं. र. देशमुख यांनी मानले. यावेळी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***
No comments:
Post a Comment