* उद्या विकास योजनांचा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा
नागपूर,दि.03:जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार, दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हा नियोजन बैठकीस सर्व लोकप्रतिनिधी, समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस जिल्हा वार्षिक योजना सन 2017-18 अंतर्गत सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना व ओटीएसपी तसेच पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता. वार्षिक योजनेंतर्गत यावर्षी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा जुलै अखेरपर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
****
No comments:
Post a Comment